|
|
|
|
|
 |
 |
 |
|
 |
मानबिंदूच्या अनोख्या विश्वात तुमचं स्वागत! आजची तरुणाई खरच खूप हुशार आणि
क्रिएटीव्ह आहे
किंवा आमच्या तरुणाईच्याच भाषेत सांगायचं झाल्यास सॉल्लिड, झक्कास
किंवा रॉकींग आहे! एकीकडॆ रोज नवनवीन येणा-या तंत्रज्ञानावर/टेक्नोलॉजीवर आम्ही
फिदा असतो; नव्या गोष्टींचा आम्हाला
हव्यास असतो आणि त्याचबरोबर संस्कारांनी
चालत आलेलं पारंपारीकतेचं लेणंही आम्ही तितक्याच आदरानं, प्रेमाने जपतो. म्हणूनच की
काय इंटरनेटवर फ़ॉरवर्ड होणा-या
अनेक ई-मेल्स मधल्या काहींमध्ये पुलंचे
हे शब्द आजही
उमटलेले दिसतात, "..पोटापाण्याचा उद्योग तर हवाच. पण
नाटक,गाणं ,कविता, अशा एखाद्या कलेशी नातं ठेवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला
जगवील आणि कलेशी असलेलं नातं जगायाचं कशासाठी ते सांगेल!"
..आणि हेच शब्द आम्हाला नकळत एक वेगळी प्रेरणा देऊन जातात; म्हणजेच
आपल्याला ’जगवणा-या’ आणि परंपरेनं चालत आलेल्या या कलांचा आणि जगण्याचा अविभाज्य
भाग बनलेल्या इंटरनेट/
SMS अशा लेटेस्ट टेक्नोलॉजीची मेळ घालून एक
आगळ वेगळं संकेतस्थळ बनविण्याचा
आमचा प्रयत्न आहे! तरुण कलाकार
आणि ते करत असलेले गायन, वादन, अभिनय, चित्रकला यांसारख्या विविध
कलाक्षेत्रात
नाविन्यपूर्ण काम आणि पर्यायाने नाट्य, संगीत, चित्रपट अशा कलेच्या
निरनिराळ्या क्षेत्रात होणारी नवनिर्मीती इंटरनेट/SMS द्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत
मानबिंदूच्या सह्हायाने पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे!
याबरोबरच मानबिंदूच्या या नवीन रुपात तुम्ही कलाकार,
चित्रपट, नाटकं, नवीन
Music Albums या प्रत्येक पानांवर तुमचे
अभिप्राय नोंदवू शकता अणि तुमचं मानांकन
(Rating) देऊ शकता! तुमच्याकडून ऐकण्यास आम्ही खूप उत्सुक
आहोत..
|
स्टार माझा ने घेतलेली
मानबिंदूची दखल.. |

[ १० जानेवारी २००९ ] |
सामना
या वृतपत्राने दिलेली
मानबिंदूबद्दल दिलेली बातमी |

[ २ जानेवारी २००९ ] |
|
|
|
 |
 |
 |
 |
|
 |
|
|